Friday, July 8, 2016

तुझे निर्झर निर्मळ प्रेम कधी कळलेच नाही मला


...तुझे निर्झर निर्मळ प्रेम
         कधी कळलेच नाही मला
   तुझ्या प्रेमाच्या ओल्याचिंब
         पावसात भिजायचे होते
          तेव्हा मी आहेच नाही ....
   तुझ्या सुख दु:खाच्या क्षणांना
            मी समजलेच नाही ...
.... का होते  अभिवार्तात मी माझ्या
     का समजावले नाही मी माझ्या मनाला ...
....घातली गवसणी समुद्राला
                  असे वाटले  मला ...
.... पण नियतीच्या खोल काळ्याकुट
          दरीत पडले आहे आता
     पडणाऱ्या पाण्याचा मार सोसते आहे ...
     बाहेर पडण्याची धडपड आता व्यर्थ  झाली आहे...
     साद घालत आहे पण आवाज नाही पोहचत तुला ...
      ... हया काळ्याकुट अंधारात जगात आयुष्य
           संपणार आहे तुझ्या शिवाय ...
    फक्त तुझ्या आठवणी राहतील सोबतीला
      ह्यात तुझा काही दोष नाही
     कारण .तुझे निर्झर निर्मळ प्रेम
         कधी कळलेच नाही मला.....

Thursday, July 7, 2016

युवकांनो उठा जागे व्हां......!!!!


युवकांनो उठा जागे व्हां
आहात तुम्ही भविष्य उद्याचे... 
नशेच्या आहारी जाऊ नकात
वाटोळे करू नकात जिवनाचे...!! 

ठेवा तुमच्या मनात आत्मविश्वास
तुमच्यात आहे शक्ती युक्ती.. 
स्वप्ना साठी मेहनत करा
वावरू द्या चोहीकडे ज्योती...!! 

येणारी पिढी आदर घेईल
अशी काहीतरी गोष्ट करा... 
ठेवू नकात मनात लोभ
सत्य अहिंसेचा मार्ग स्विकारा...!! 

नियोजन करा सर्व गोष्टीचे
वेळेचे तुम्ही सदउपयोग करा... 
अांधाराला सोबती नका करू 
उजेडाची तुम्ही साथ धरा...!! 

******************************

नोट -मित्रहो  नशा करू नकात परिनाम वाईट होतील तुमची हीच वेळ आहे चांगले काम करण्याची काहीतरी नवीन करुन तुमचे आणि तुमच्या देशाचे नाव उज्वल करण्याची तुमच्यात आहे खुप काही लपलेलं ते तुम्ही बाहेर काढा ज्या कामात रुची आहे ते काम करा भविष्याचे नयोजन करा मग बगा यश तुमच्या पाठीशी असेल... धन्यवाद